नमस्कार मित्रानो महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती जमाती (OBC/ VJNT) तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून MHT- CET/ JEE/NEET-2025 करिता प्रशिक्षण पूर्ण योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी लवकरात लवकर सर्व विध्यार्थ्यानी आपले अर्ज भरून घ्यावेत.
तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था याच्या तर्फे मोफत टॅब व 6 Gb डेटा/Day देण्यात येत आहे.
हि योजना मागास प्रवर्गातील (OBC/ VJNT) विद्यार्थीसाठी महाज्योती म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था याच्या तर्फे राबवण्यात येत आहे.
OBC/ VJNT
योजनाच्या लाभासाठी पात्रता
- उमेदवार हा महाराष्ट्रचा रहिवासी असावा/असावी .
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी पैकी असावा / असावी.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर नॉन क्रिमीलेअर, जात प्रमाणपत्र व रहिवासी दाखला उत्पन्न गटातील असावा / असावी .
- जे विद्यार्थी सन 2023 मध्ये १० वी ची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी १० वी प्रवेश पत्र व ९ वी ची गुणपत्रिका जोडावी.
- विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्यांने भविष्यात सूचनांप्रमाणे अपलोड करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी लागणारे कागद पत्रे
- ९ वी ची गुणपत्रिका
- १० वी बोर्ड परीक्षेचं प्रवेशपत्र
- आधार कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- फोटो
- स्वाक्षरी
विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ
- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्फत MHT-CET /JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते.
- ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB /Day इंटरनेट डेटा पुरविण्यात येतो.
अर्ज कसा करावा
- प्रथम उमेदवार यांनी महाज्योती यांच्या अधिकृत वेबसाईट https://mahajyoti.org.in/ संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील Application For “MHT-CET/JEE/NEET 2025 Training”यावर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
- अर्जासोबत वरील सर्व कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे.
जाहीरात ची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून पाहू शकता