मित्रानो खूप दिवसापासून महाराष्ट्र मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये जागा निघाल्या नव्हत्या पण आता लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये भरती होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग Maharashtra PWD Recruitment 2023 महाराष्ट्र शासन लवकरच कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि स्थापत्य अभियंता सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करणार आहे. Maharashtra PWD Recruitment 2023 मध्ये JE पदांसाठी 532 आणि सिव्हिल इंजिनीअर असिस्टंट पदासाठी 1371 उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.
Maharashtra PWD Recruitment 2023
- सदर अर्जाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, वित्त विभाग, शासन निर्णय, दि. ३१.१०.२०२२ मधील तरतुदीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील ५३२ रिक्त पदे भरण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे. तथापि, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गातील रिक्त पदांची माहिती संबंधित मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांचेकडून ठेवण्यात येत असल्याने सदर माहिती शासनस्तरावर उपलब्ध नाही
तसेच, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक केंमाअ-२००८/प्र.क्र.९३/६ (मा.अ.) दि.६.९.२००८ मधील तरतुदीनुसार सार्वजनिक प्राधिकरणांकडे कलम २ (च) मध्ये व्याख्या केलेली व उपलब्ध असलेली माहितीच पुरविणे अभिप्रेत असून जेथे वेगळयाने माहितीचे संकलन, संशोधन, पृथ्थक्करण करणे आवश्यक आहे, अशा स्वरुपातील माहिती पुरविणे अभिप्रेत नाही. यास्तव, आपण मागितलेली कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गाची प्रवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती शासन स्तरावरुन देता येणे शक्य नाही.
- उपरोक्त उत्तराने आपले समाधान न झाल्यास हे पत्र प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत प्रथम अपिलीय अधिकारी तथा अवर सचिव (आस्थापना), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे अपील करता येईल.
नोट : वरील दिलेली सर्व माहिती हि अधिकृत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या PDF मधून जशी च्या तशी घेतलेली आहे याची नोंद घ्यावी.
एकूण रिक्त पद संख्या :
- कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)-532 पदे
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक(Civil Engineer Assistant)-1371 पदे
शैक्षणिक पात्रता:
- Diploma/BE/B. Tech
वयोमर्यादा:
- खुला – 18 ते 38 वर्ष
महत्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात- लवकर update होईल
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- लवकर update होईल
अधिकृत वेबसाईट
- येथे क्लिक करा : http://mahapwd.gov.in/
जाहीरात ची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून पाहू शकता