मित्रानो सरकार ने स्वातंत्र्यच्या महोत्सवी वर्षात शाषनात 75000 जागा भरण्याबाबत पत्र काढले होते.त्यानुसार खूप दिवसापासून रखडलेल्या जिल्हा परिषदांमधील ग्रामविकास विभागाच्या अ खात्यातील जिल्हा परिषद अंतर्गत गट- क मधील आरोग्य व इतर विभागांतील एकूण 18 हजार 939 पदे भरतीचा मार्ग खुला झाला असून, पदभरतीला जिल्हा परिषदांनी सर्वोच्च प्राथमिकता द्यावी, अशा सूचना ग्रामविकास विभागाचे उपसचिवांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाने 21 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद या जिल्हा पातळीवर TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाईन परीक्षांचे आयोजन करतील असे सांगितले होते. पण आता त्यात प्रशासकीय व तांत्रिक अडचणी समोर आल्याने आता जिल्हा परिषद भरती 2023 आता विभागीय स्तरावर होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत 2023 मध्ये 18939 रिक्त पदांसाठी ZP maharashtra Recruitment 2023 लवकरच जाहीर होणार आहे. ZP maharashtra Recruitment 2023 ही दोन टप्यात होणारआहे.
सर्व जिल्हा परिषदांनी सदर पदभरतीबाबत संक्षिप्त टिप्पणी /प्रेसनोट तयार करण्यात येणार आहे. ज्यामध्ये शासनस्तरावर सदर पदभरतीसाठी झालेली कार्यवाही, जिल्हा परिषद स्तरावर करण्यात आलेली कार्यवाही व पदभरतीबाबतची सद्यस्थिती याचा अंतर्भाव असेल .
सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद भरती 2023 ची परीक्षा आय.बी.पी.एस. या कंपन्यांद्वारे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यानुसार, IBPS कंपनीसोबत बैठका घेऊन करार (MOU) येत्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. या संबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामविकास विभाग यांचे 12 एप्रिल 2023 रोजी एक पत्रक जाहीर झाले आहे.
ZP maharashtra Recruitment 2023
रिक्त पदे
- 18939 पदे
पदांचे नाव
1.कनिष्ठ अभियंता (ग्रापापू विभाग) 2.कनिष्ठ अभियंता (बांधकाम विभाग) 3.कनिष्ठ अभियंता (यांत्रिक विभाग) 4.विस्तार अधिकारी (पंचायत) 5.कंत्राटी ग्रामसेवक 6.आरोग्य पर्यवेक्षक 7.औषध निर्मिती 8.प्रयोगशाळा तंत्रज्ञ 9.आरोग्य सेवक 10.विस्तार अधिकारी(कृषी) 11.स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 12.पशुधन पर्यवेक्षक 13.वरिष्ठ सहाय्यक(लेखा) 14.अंगणवाडी पर्यवेक्षिका(सरळसेवा) 15.विस्तार अधिकारी 16.कनिष्ठ लेखाधिकारी 17.कनिष्ठ यांत्रिकी |
वेतनश्रेणी
- 15,000 रुपये – ते 47,600 पर्यंत.
वयाची अट
- खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्षे.
- राखीव प्रवर्ग 18 ते 43 वर्षे.
ग्रामविकास विभागानं सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना रखडलेली पदभरती तत्काळ करा असे आदेश दिले आहेत. यासंबंधीचं पत्रक उपसचिव विजय चांदेकर यांनी प्रसिध्द केलं आहे. या आदेशामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.संपूर्ण GR ची माहिती खाली दिलेली आहे.
ग्रामविकास विभाग अधिकृत वेब साईट : https://rdd.maharashtra.gov.in/
ZP maharashtra Recruitment 2023 नवीन GR पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा