MPSC महाराष्ट्र लोक सेवा आयोग यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या मागणी पत्रानुसार अन्न व औषध प्रशासन सेवेतील सहाय्यक आयक्त अन्न, गट -A आणि अन्न सुरक्षा अधिकारी, गट ब या संवर्गाच्या भरती करिता दिनांक २4 फेब्रुवारी 2023 रोजी जाहिरात आणि दिनांक 17 मार्च 2023 रोजी शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते.
MPSC या अंतर्गत दिनांक 18 एप्रिल 2023 द्वारे अन्न व औषध प्रशासकीय सेवेतील सहाय्यक आयुक्त अन्न गट अ आणि अन्न सुरक्षा अधिकारी गट ब या संवर्गाकरिता शैक्षणिक अर्हतेसंदर्भात कृषी क्षेत्र शाखेतील पदवीच्या अनुसंगाने प्राप्त अभिप्रायानुसार B.A.M.S. तसेच B.S.C कृषी पदवीधर उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी आले आहे.
महाराष्ट्र नागरीसेवा परीक्षेतील इतर सेवांकरिताअर्ज सादर केल्याच्या तथापि अन्न व औषध प्रशासन सेवेकरिता विकल्प सादर करू शकले नाहीत अशा B.A.MS व B.S.C कृषी पदवीधर उमेदवारांना त्यांच्या प्रोफाइलमध्ये प्रस्तुत संवर्ग करिता Recheck Eligibility या पर्याय द्वारे पात्रता तपासून पात्र असल्यास केवळ अन्न व औषध प्रशासन सेवेतील अन्न सुरक्षा अधिकारी गट ब तसेच सहाय्यक आयुक्त अन्न गट अ संवर्गाकरीता विकल्प सादर करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत आहे.
MPSC नागरी सेवा सयुंक्त पूर्व परीक्षा 2023
अर्ज सादर करण्याचा कालावधी
- दिनांक 20 एप्रिल 2023, दुपारी 1 Pm पासून दिनांक 27 एप्रिल 2023, रात्री 11:59 Pm पर्यंत
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख(ऑनलाईन)
- दिनांक 27 एप्रिल 2023
चलन भरण्यासाठी प्रत घेण्याची शेवटची तारीख (SBI)
- दिनांक 28 एप्रिल 2023
चलन द्वारे परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख
- दिनांक 29 एप्रिल 2023
नोट : वरील दिलेली सर्व माहिती हि अधिकृत PDF मधून जशी च्या तशी घेतलेली आहे याची नोंद घ्यावी.
सदर शुद्धीपत्रक व मूळ जाहिरात हि अधिकृत वेब साईट https://mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in पाहू शकता तसेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून PDF पाहू शकता